श्री स्वामी समर्थ मठातर्फे आयोजित केले जाणारे सामाजीक उपक्रम.
१) गोशाळा. (नियोजित)

हिंदू संस्कृतीमध्ये मानवतेस असलेले गायीचे योगदान अनन्यसाधारण आहे. गायीचे आरोग्यदाई दुध त्या दुधापासून तयार केले जाणारे दही, तूप व ताक ई. पदार्थ, गोमुत्राचे औषधी गुणधर्म. गोमयाचे उपयोग, गायीच्या ह्या उपयुक्ततेमुळेच गायीला कामधेनु असे म्हटले जाते. म्हणूनच गायीचे सत्पात्रि दान हे पुण्यप्रद मानले गेले आहे. अनेक भाविकांची असे दान करण्याची इच्छा असते पण अशा गायींचे संगोपन आणि संवर्धन करण्याकरिता पुरेशी जागा आणि मनुष्यबळ ह्याची आवश्यकता असते. ह्या कार्यास सुद्धा असंख्य दात्यांचे आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे असते. म्हणूनच अशी सुसज्ज गोशाळा उभारण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस आहे. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला संपर्क करावा हि विनंती.


संदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष

जलद मेनू


ताजी बातमी


Visitors Count
Reach Us
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ