• Swami Samarth Banner 1
  • Swami Samarth Banner 2
  • Swami Samarth Banner 3
  • Swami Samarth Banner 4
  • Swami Samarth Banner 5
  • Swami Samarth Banner 6
  • Swami Samarth Banner 7
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ

हिरव्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या वसई तालुक्यात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. निर्मळ येथे आद्य श्री शंकराचार्यांची समाधी असून तेथे मंदिर आहे. तेथून जवळच अंदाजे २ कि.मी.वर श्री दत्तडोंगरी हे जागृत देवस्थान आहे. निर्मळजवळील वाघोली येथे अगदी अलीकडेच बांधण्यात आलेले आणि प्रति शनिशिंगणापूर म्हणून नावारूपाला आलेले शनिमंदिर आहे. याच पुण्यपावन परिसरातील भुईगाव या गावी श्री स्वामी समर्थ मठ आहे.

निर्मळजवळील भुईगाव या अगदी छोटयाशा गावात श्री. संदीप म्हात्रे यांच्या घरी श्रावणातल्या पहिल्या गुरुवारी म्हणजे दि. ३१ जुलै २००२ रोजी "श्री स्वामी समर्थ" उपासना सुरु झाली. नंतर दर गुरुवारी हि उपासना नियमित होत राहिली. सुरवातीच्या काळात या उपासनेला जमलेल्या १०-१२ भक्तांची संख्या हळूहळू १०० च्या वर पोहचली. उपासनेसाठी घरची जागा कमी पडू लागली. यावर श्री. संदीप म्हात्रे यांनी उपासनेसाठी एक कायमस्वरूपी जागा असावी असा विचार सर्वासमोर मांडला. आपल्या घराशेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत हि वास्तू बांधावी असा विचार संदीपदादानी सर्वाना सांगितला. दादांच्याच संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने आज उभ्या असलेल्या मठाची उभारणी करण्यात आली. मठाची स्थापना आणि "श्री" ची प्राणप्रतिष्ठा माघ शु. १२ अर्थात १२ फेब्रुवारी २००८ या शुभदिनी झाली.Read More

श्री गुरु दत्तात्रेयांना

श्री गुरु दत्तात्रेयांना उपास्य दैवत मानून जे भाविक उपासना आराधना करतात ते दत्त संप्रदायी म्हणून ओळखले जातात. श्री दत्तात्रय म्हणजे दोन शब्दांचा संगम दत्त आणि अत्री. Read More

श्रीपाद श्री वल्लभ

श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार म्हणून प्रख्यात असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे होत. दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि वेद तुल्य असलेल्याRead More

श्री नृसिंह सरस्वती

श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून प्रख्यात असलेले नृसिंह सरस्वती ह्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील विदर्भ परिसरातील लाड - कारंजा Read More

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज.

आज उभ्या महाराष्ट्रातल्या घरा घरात घेतले जाणारे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. हम गया नही| जिंदा है| अशी प्रचीती अजूनही त्यांच्या Read More

संदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष

जलद मेनू


ताजी बातमी


Visitors Count
Reach Us
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ